औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

औरंगाबाद : सोयगावला उष्णतेची लाट,हवेतही उष्मवारे

सोयगाव दि.२४(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):सोयगावसह तालुकाभर बुधवारी अचानक उष्णतेची लाट पसरल्याने शहराचे जनजीवन विस्कळीत झाले होते,वाढत्या उष्णतेमुळे शहरवासीयांनी घराबाहेर पडणे टाळल्याने शहरात कमालीचा शुकशुकाट दिसून आला होता.
सोयगावसह तालुकाभर बुधवारी अचानक उन्हाची तीव्रता वाढल्याने पारा ४२ अंशाच्यावर गेला होता.दरम्यान हवेतही उष्णता असल्याने बाहेर फिरणे मुश्कील झाले होते.शहरात मात्र कमालीचा सन्नाटा पसरला होता.सूर्य आग ओकत असतांना येणारे वारेही उष्णतेचे असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

शेती शिवारात सन्नाटा-

सोयगावसह तालुकाभर आगामी खरीप हंगामाच्या मशागतीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले असून बुधवारी मात्र शेतमजुरांनी शेताकडे पाठ फिरविल्याने शेती शिवारात सन्नाटा पसरला होता

राज्याच्या काही भागात बुधवारी शून्य सावली दिवस होता.त्यामुळे(ता.२४)सावलीच दिसत नसल्याने सूर्य कायम डोक्यावरच राहत असल्याने आगीचा भडका मोठा होता.शून्य सावली दिवसामुळे अचानक उन्हाची तीव्रता वाढल्याचे काहींनी सांगितले.जळगाव,भुसावळचं सीमारेषेवर असलेल्या काही भागातच शून्य सावलीचा प्रकार होता.त्यामुळे भुसावळच्या तापमानात सोयगावकरांना मोठी झळ बसली होती.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.