मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी घेतला पुढाकार
पाटोदा (प्रतिनिधी): पाटोदा येथील मित्र मंडळ वर्ग मित्राच्या मदतीला धावले, सध्याच्या धावपळी च्या युगात कोणाला मदत तर सोडाच कुणाला भेटायला सुध्दा वेळ नाही. याला पाटोदा येथील जिल्हा परिषद हायस्कुलचे इयत्ता ५ वी ते १० वी चे वर्ग मित्र अपवाद ठरले आहे. सन-१९८५ ते १९९१ मध्ये जिल्हा परिषद हायस्कुल पाटोदा ची बॅच या बॅच चा गरीब विद्यार्थी शेख खालेद गफुर याच्या शालेय शिक्षणा मध्ये खंड पडु नये म्हणून त्या वेळेस त्याला आर्थिक मदत करुन वर्ग मित्राने एम.ए.हिन्दी पर्यत शिक्षणास मदत केली. परंतु पुढे नोकरी न लागल्या मुळे ते जामखेड येथील मंडपवर रोजदारीने काम करु लागले. गरीब आर्थिक परिस्थितीशी सामना करत, त्याने आपल्या मुलीला १२ वी पर्यंतचे शिक्षण दिले. व शिक्षणानंतर तिचे लग्न जमविले.व लग्नाची लग्नपत्रिका घेवून ते पाटोदा येथील मित्रांकडे आले गरीब मित्राच्या मुलीचे लग्न आहे हे समजताच सर्व वर्ग मित्रांनी तातडीची बैठक घेवून आर्थिक मदत करण्याचे ठरविले व ताबडतोब रक्कम जमा करण्यात आली. बाहेरगावी राहत असणाऱ्या वर्ग मित्रांनी तातडीने मदत पाठवून दिली. वर मंगळवार दिनांक:- २३ रोजी त्याला पाटोदा येथे डॉ.रविंद्र राजपुरे यांच्या हॉस्पीटल मध्ये बोलावुन त्याला मित्रांकडून जमलेली २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. व येथून पुढे कोणत्याही वर्ग मित्रांच्या मुला, मुलीस शिक्षणासाठी व लग्न कार्यास आर्थिक मदत करण्याचा संकल्प करण्यात आला. या मध्ये भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ पोकळे,पाटोदा नगर पंचायतचे नगरसेवक अॅड. सुशील कौठेकर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. जब्बार पठाण, बाबासाहेब मुळे पाटील, अॅड. सय्यद वहाब भाई, डॉ.रविंद्र राजपुरे, डॉ. रविंद्र तोटे, सोमेश्वर जावळे, सतिष कदम (बीड), संतोष डावकर (वडवणी), हमीद चाऊस दिलावर सिंह राजपुत (बीड), डॉ.नंदकुमार जाधव, या जिवलग वर्ग मित्रांनी या लग्न कार्य साठी मदत व पुढाकार घेतल्याने शेख खालेद गफुर यांच्या डोळयात आनंदाआश्रु आले. व ते या वेळी बोलताना म्हणाले की माझी आर्थिक परिस्थिती नाजुक असल्यामुळे मला मुलीच्या लग्नाची खूप चिंता होती, परंतु माझे तीस वर्षांपूर्वीचे सर्व मित्र मंडळी ऐन वेळेस माझ्या मदतीला धावून आले, या मुळे मला मोठा दिलासा मिळाला आहे.आयुष्यात बाकी काही नाही कमवता आले तरी चालेल, पण जिवनात जिवाभावाचे मित्र कमवावे. या मुळे आयुष्यात कसलीच चिंता राहत नाही. या पुढे या पेक्षा चांगले समाजकार्य करण्याचा संकल्प या वेळी पाटोदा येथील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.