बीड जिल्हाब्रेकिंग न्युजभ्रष्टाचार विषयकविशेष बातमीसामाजिक

भ्रष्ट शासकीय अधिकारी आणि गुत्तेदार यांच्यासाठी कोरोना वरदान ―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―पिंपरनई – बांगरवाडा २ कोटी ५० लाख रु.चा रस्ता निकृष्ट दर्जाचा खडी अवैध खदानीतील तर सिमेंट रस्ता नाली विरहीत , पुलावर दबाई सुद्धा नाही.

कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हास्तरीय यंत्रणा गुंतलेली असताना भ्रष्ठ अधिकारी & गुत्तेदार यांचे चांगलेच फावले आहे.जिल्हाधिकारी यांना पुराव्यानिशी तक्रारी देऊनसुद्धा अधिकारी कारवाई करण्याचे नाव घेत नाहीत. भ्रष्ट शासकीय अधिकारी & गुत्तेदार यांच्यासाठी कोरोना वरदान ठरले आहे.

अवैध खडीक्रशर , शासनाची फसवणुक

पिंपरनई – बांगरवाडा रस्ता तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ५:६ की.मी. कामासाठी एकुण २ कोटी ५० लाख रू निधि दिला होता.गेल्य ७० वर्षांपासून दळणवळणाच्या मुलभुत सुविधेपासुन वंचीत बांगरवाडा ग्रामस्थांना पंकजाताई मुंढे यांनी न्याय दिला.मात्र गुत्तेदार आणि ग्रामिण रस्ते विकास महामंडळ संस्था बीड यांच्या कार्यकारी अभियंता बेदरे यांनी शासनाची फसवणुक करुन अवैध खदानीतील खडी रस्ते कामासाठी वापरली आणि खडी ४० की.मी. नाळवंडी येथुन आणल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाची फसवणुक करुन कोट्यवधी रुपयांचा अपहार केला.

Png;base64,iVBORw0KGgoAAAANSUhEUgAAAYYAAADcAQMAAABOLJSDAAAAA1BMVEUAAACnej3aAAAAAXRSTlMAQObYZgAAACJJREFUaIHtwTEBAAAAwqD1T20ND6AAAAAAAAAAAAAA4N8AKvgAAUFIrrEAAAAASUVORK5CYII=

सिमेंट रस्त्याच्या नाल्या चोरीला गेल्या

वर्ष भरापुवी केलेल्या सिमेंट रस्ता दोन वेळा दुरुस्ती केली असुन हाताने खडी उकरली जाते.बांगरवाडा आणि पिंपरनई येथिल सीमेंट रस्त्यांना पाणी जाण्यासाठी नाल्या केलेल्या नाहीत.तरी सुद्धा कार्यकारी अभियंता बेदरे यांनी काम न बघताच बिले मंजूर करून दिली.

पुलांचे काम निकृष्ट दर्जाचे , साधी रोलरने दबाई सुद्धा केली नाही.एकुण ९ पुलापैकी ७ पुले बांधली.

Png;base64,iVBORw0KGgoAAAANSUhEUgAAAYYAAADcAQMAAABOLJSDAAAAA1BMVEUAAACnej3aAAAAAXRSTlMAQObYZgAAACJJREFUaIHtwTEBAAAAwqD1T20ND6AAAAAAAAAAAAAA4N8AKvgAAUFIrrEAAAAASUVORK5CYII=

रस्ता मधेच खंडित केला असुन मोठा खड्डा असून अपघाताची शक्यता

पिंपरनई ते बांगरवाडा दरम्यान रस्ता मधेच सोडला असुन त्या ठिकाणी मोठा खड्डा असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे वरील कामाचे क्वालिटी कंट्रोलर कडुन कामाची तपासणी करणे ; अवैध खदानीतील खडी चोरुन वापरली तर याप्रकरणी खणिज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन दंडात्मक कारवाई करावी’ शासनाची फसवणुक करुन कोट्यवधी रुपयांचा अपहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत यामागणीसाठी दि. १३ एप्रिल २०२० सोमवारी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी बीड मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य व पालकमंत्री बीड यांना निवेदन देण्यात आले आहे.

Back to top button