जालना दि.२५: दुष्काळ परिस्थितीमुळे गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याकारणाने त्यासाठी पर्याय म्हणून पाणी टँकर चालू करावे,दुष्काळामुळे जळालेल्या फळबागांचा पंचनामा करावा,गावातील दारू बंद करावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी शिरनेर ग्रामस्थ जन क्रांती संघाचे संस्थापक डॉ संदीप घुगरे यांच्या उपस्थितीत अंबड येथील तहसीलदार यांना निवेदन देणार आहेत.
तरी सर्वांनी तहसील कार्यालय अंबड येथे निवेदन देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जन क्रांती युवा संघाचे तालुकाध्यक्ष किरण लिंगयात यांनी केले आहे.