अकोला दि.२५: अकोट तालुक्यातील ग्राम देऊळगाव येथील अनिल सहदेवराव गावंडे या शेतकरयाच्या शेतातील उभा असलेला २ एकरातील गहू जळून खाक झाला. यामुळे या शेतकरयाचे हजारो रूपयांचे नुकसान झालेआहे. सदर आग शाॅट॔सक्रिटमुळे लागल्याची माहिती आहे. अनिल गावंडे या शेतकरयाने वर्षभर अतिशय मेहनत करून गहू उभा केला. ३ एकरांत पेरलेला गहू सध्या काढण्यावर आला होता. दरम्यान आज दुपारी २ वाजताच्या सुमारास त्या शेतातील गव्हाला अचानक आग लागली. यामध्ये जवळपास २ एकरातील सर्व गहू जळून खाक झाला आहे. यामुळे या शेतकरयाचे लाखाच्या जवळपास नुकसान झाले. शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी असलेले पाइप सुध्दा या भीषण आगीत जळून खाक झाले. या भीषण आगीत जळून खाक झाले .सदर आग शाॅट॔सक्रिटमुळे लागल्याची माहिती आहे. शासनाने सदर शेतकरयांच्या शेतातील नुकसानाची पाहणी करून मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे. सद्यस्थितीत शेतकरी अनेक अडचणींचा सामना करीत असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. पिकाला भाव नाही, बाजारात विकले तर लवकर पैसे मिळत नाहीत.अशा समस्या शेतकरयांसमोर उभ्या असतांना अचानक पणे काढणीवर आलेला गहू खाक झाल्याने या शेतकरयांवर फार मोठे संकट कोसळले आहे.