सोयगाव,दि.२५(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): महिनाभरापासून पाणीटंचाईच्या फेऱ्यात अडकलेल्या तिखी ता.सोयगाव येथील पुरवठा विहिरीची खोली करून गाळ काढण्याची लेखी निवेदनाद्वारे केलेली मागणी संबंधित विभागांनी ग्राह्य न केल्याने अखेरीस ग्रामस्थांनी लोकसहभागातून पुरवठा विहीर खोदून गाळ काढला आहे.मात्र विहीर खोदण्याची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांकडूनच गरमपंचायत प्रशासनाने खोदकाम करतांना हानी झाल्यास त्यास जबाबदार तुम्हीच राहणार असा खुलासच लिहून घेतला होता.परतू तरीही ग्रामपंचायत प्रशासन आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा यांच्यात समन्वय न झाल्याने ग्रामस्थांनी स्वखर्चातून विहिरीची दुरुस्ती केली आहे.
डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या तिखी ता.सोयगाव या गावाला पाणी पुरवठ्याची विहीर आहे.गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असतांना ग्रामस्थांनी या विहिरीला खोदकाम करण्याची लेखी मागणी ग्रामपंचायतीकडे केली परंतु विहीर गावालगत आहे.त्यासाठी काही हानी झाल्यास तुम्हीच जबाबदार राहाल असा चक्क जबाबच ग्रामस्थांनी लेखी देवूनही ग्रामपंचायत आणि पाणी पुरवठा जिल्हा परिषद यांच्यातील समन्वयाअभावी काम न झाल्याने ग्रामस्थांनी स्वखर्चातून काम करण्याचा पवित्र घेतला,घोटभर पाण्यासाठी चक्क ग्रामस्थांना विहिरीत उतरून खोदकाम हाती घ्यावे लागले,याकामी अजीज पठान,अलीम पठान,इस्माईल पठान,नदीम शेख आदि ग्रामस्थांनी विहिरीत उतरून खोदकाम केले आहे.पहिल्या टप्प्यात तब्बल पाच फुट काम केल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले.
काय म्हणते ग्रामपंचायत-
याबाबत संबंधित ग्रामपंचायातीशी संपर्क साधला असता,टंचाई काळात विहिरीचे खोदकाम हाती घेता येते,परंतु जिल्हा परिषदे पाणी पुरवठा विभागाला पत्र व्यवहार करूनही त्यांनी अद्याप अंदाजपत्रक सादर न केल्याने काम हाती घेता आले नाही,उलट अर्थी जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग काम करतांना होणाऱ्या हानीचा जबाबदारी ग्रामपंचायतीने घ्यावी असे शंभर रुच्या बॉंडपेपरवर नमूद करून द्यावे असे ग्रामपंचायतीला संबंधित विभागाने चक्क पत्रच दिले,तर असे दुसऱ्या बाजूने जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता संबंधित ग्रामपंचायतीने प्रस्तावच दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.