क्राईमबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोलीस चौकीत गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

बीड - टीम आठवडा विशेष: आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस चौकीत एका महिला कर्मचाऱ्याने वरीष्ठासोबत झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर चौकीत गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.या घटनेने शहरात खळबळ उडाली असल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्तासाठी पोलीस चौकी उभारण्यात आलेली आहे. वेळोवेळी सांगूनही एकाच जागेवर ड्युटी देण्यात येत आहे.नेहमी प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ड्युटी सुरू असताना वरिष्ठांनी चौकीत न बसता बाहेर खुर्चीवर बसण्यास सांगितले. यावरूनच महिला कर्मचारी व वरिष्ठांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. राग अनावर झाल्याने सदर महिला कर्मचाऱ्याने चक्क चौकीत जाऊन पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. चौकीच्या आवारातील नागरिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सदर चौकीचा दरवाजा दगडाने दरवाजा तोडत सदर महिला कर्मचाऱ्याचा जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच ठाणे प्रमुख व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात येत सदर महिलेची समजूत काढली.या प्रकरणाने पोलीस खात्यातील अनागोंदी उघड्यावर आली आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    हजेरी मेजरकडून सातत्याने दिली जात होती एकाच ठिकाणी ड्युटी

    आज जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून उचलण्यास हजेरी मेजर जबाबदार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सदर महिलेने हजेरी मेजरकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र त्यांना ड्युटी बदलून देण्यात आली नाही. आज झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर या महिला पोलीस कर्मचाऱ्याने हे पाऊल उचलले असल्याचे कळते आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.