जालना : शिरनेर गावाच्या समस्या सोडवा ; गावकऱ्यांसह जन क्रांती संघची मागणी

अंबड दि.२५: अंबड तालुक्यातील शिरनेर गावातील नागरी समस्या बाबत जन क्रांती संघचे संस्थापक डॉ. संदीप घुगरे तसेच गावातील दुष्काळग्रस्त सामान्य नागरीक यांनी दिनांक २५ रोजी तहसीलदार अंबड यांनी गावातील विविध समस्या बद्दल निवेदन दिले
यानिवेदनात त्यांनी सांगितले की मौजे शिरनेर हे गांव ३००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे मागिल वर्षापासुन गावामध्ये तथा परिसरात अत्यल्प पावसामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे गावातील सामान्य नागरीक कर्जबाजारी झालेला आहे त्याच बरोबर गावात बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे . यामुळे शेतक – यामध्ये आत्महत्येचा विचार मनामध्ये निर्माण होईल अशी भयंकर परिस्थीती निर्माण झाली आहे . यामध्ये गावातील प्रश्नाकडे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे शासकीय पावले उचलली जात नसल्यामुळे जन क्रांती संघ तथा गावातील नागरीक , महिला व युवकांन मार्फत आपणास निवेदन देत आहे.

  1. गावातील अवैधरित्या चालु असलेली दारु विक्री तात्काळ बंद करावी याविषयी यापुर्वीही दिनांक २ जानेवारी रोजी तहसिल कार्यालय अंबड व दिनांक ९ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक अंबड यांना निवेदन दिले असुन यावर कोणतेही कायदेशिर कार्यवाही प्रशासना मार्फत झाली नाही.
  2. दुष्काळामुळे मौजे शिरनेर गावामध्ये मागिल काही महिन्यापासुन गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे . यासाठी शासनामार्फत तात्काळ पाण्याचे टैंकर चालु करावे.
  3. दुष्काळ परिस्थीतीमुळे गावातील शेतक – यांच्या शेतीमधील उभे फळबाग जळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे . त्यामुळे गावातील तथा परिसरातील फळबागाचा पंचनामा तात्काळ करुण अनुदान देण्यात यावे .
  4. दुष्काळ परिस्थीतीमुळे गावातील जनावरासाठी तात्काळ चारा छावणी चालू कराव्यात , त्याच सोबत गावकर्यांना रोजगार उपलब्ध करून घ्यावा

या सर्व मागण्याकडे प्रशासनाला तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात म्हणले आहे या निवेदनावर जन क्रांती संघ संस्थापक – डॉ.संदीप घुगरे,अंबड तालुका संघटक – किरण लिगायत,किशोर घुगरे,महेश बघाटे,सचिन घुगरे,अविनाश भोजने,बळीराम गायक सह इतर गावकर्यांच्या साह्य आहेत

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.