औरंगाबाद : सोयगाव तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा,६० गावे घोटभर पाण्यासाठी होरपळली

सोयगाव दि.२५(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):सोयगाव तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अधिकच तीव्र होत असतांना तब्बल ६० गावांना भीषण पाणीटंचाईचा फटका बसला असल्याने या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायी भटकंती करावी लागत आहे.दरम्यान तालुक्यात पाणीटंचाईचे विदारक दृश्य निर्माण झाले असतांना,तालुका प्रशासनाचे मात्र केवळ आठ गावांचे टँकरचे प्रस्ताव अद्यापही मंजुरीसाठी महिनाभरापासून धूळखात पडून आहे.त्यामुळे उर्वरित ५२ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे.
सोयगाव तालुक्यात निवडणुकापूर्वी तब्बल ६० गावांना तीव्र पाणीटंचाईचं झळा बसत असतांना निवडणुकांच्या कामात व्यस्त असलेल्या तालुका प्रशासनाच्या वतीने यापूर्वीच्या टंचाईग्रस्त गावांची पाठविलेली टँकरची प्रस्ताव अद्यापही मंजुरीसाठी धूळखात पडून असल्याने सोयगाव तालुक्यातील या आठ गावांच्या प्रस्तावावर अद्यापही शिक्कामोर्तब झाले नसल्याने ५२ गावांचा टंचाईचा प्रश्न अद्याप कायम राहिला असतांना तालुक्यात तब्बल ६० गावांना पाणीटंचाईचा वणवा पेटला आहे.दरम्यान ग्रामसेवकांनी तातडीच्या गावांच्या पाठविलेल्या टँकरच्या प्रस्तावावर संबंधित गावांची पाहणी करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने काही गावांचे प्रस्ताव अद्यापही अपूर्णतेअभावी पंचायत समितीच्य कार्यालयातच पडून आहे.हातपंप कोरडेठाक झाले असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शेतीशिवारे व जंगल भागात भटकंती करावी लागत असलाने भर उन्हात महिलांना जंगलात जावून पिण्याचे पाणी शेन्दावे लागत आहे.

प्रभारी गटविकास अधिकारी हाच पाणीटंचाईचा मूळ प्रश्न-

सोयगाव पंचायत समितीला प्रभारी गटविकास अधिकारी असल्याने या गटविकास अधिकाऱ्याला यंत्रणा राबवितांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने व सोयगावचं प्रस्तावावर तातडीने मंजुरी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिरंगाई होत असल्याने पाणी टंचाईचं मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे.

निवडणुकानंतर नागरिकांची तहान वाढली-

दरम्यान लोकसभा निवडणुकांचे मतदान झाल्यानंतर काही गावांमध्ये निर्जळी निर्माण झाल्याने एरव्ही भर उन्हात गावागावात येणारे पुढारी मात्र मतदानानंतर गायब झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोणापुढे उपस्थित करावा हाच प्रश्न नागरिकांना पडला आहे.

नियंत्रण सुटले-

दरम्यान कर्मचाऱ्यांची दांडी आणि ग्रामसेवकांची दिरंगाई यामुळे काही गावात गंभीर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने या दिरंगाई करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान कवली,निमखेडी,उमरविहीरे या गावांची टंचाई गंभीर झाली असतांना संबंधित ग्रामसेवकांनी मात्र कानाडोळा केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आल आहे.

टँकरचे प्रस्ताव प्रवासातच-

दरम्यान टंचाईचे उग्र रूप धारण केलेल्या तब्बल दहा गावांचे टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीच्या संबंधित विभागाकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला मंजुरीसाठी पाठविण्यात आले असता,या प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगण्यात आले असून या प्रस्तावाच्या संचिका मात्र अद्याप सिल्लोड-सोयगाव प्रवासात अडकाळी असून परत मात्र संबंधित विभागाला प्राप्त झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.