सोयगाव(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):बनोटी(वाडी) ता.सोयगाव येथील दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थिनीवर तुझे आमच्या कैलास सोबत प्रेम असल्याचा आरोप करून मारहाण केल्याने असह्य झालेल्या विद्यार्थिनीने घरातील विषारी औषध प्राशन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी बनोटी वाडी येथे घडली आहे.याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मयताच्या पित्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनोटी परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा देणारी दिव्या प्रभू गव्हाणे(वय १६)हिला शुक्रवारी घरी एकटी असतांना कैलास छोटू सोनवणे याच्या नातेवाईकांनी तुझे आमच्या कैलास सोबत प्रेम प्रकरण आहे.असे म्हणून तिला बेदम मारहाण करून अपमानित केल्याने असह्य झालेल्या विद्यार्थिनीने घरातील विषारी औषध प्राशन केले.तिला गम्भीरावस्थेत बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता,तातडीने उपचारासाठी जळगावचं सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर उपचारादरम्यान तिचा शनिवारी मृत्यू झाला.दरम्यान मयत दिव्याचा मृतदेह नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात आणून आरोपींना तातडीने अटक करण्याची माग्नुई केल्यावरून पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून पित्याच्या फिर्यादीवरून कैलास छोटू सोनवणे,रंजाबाई गोटू सोनवणे,जागृती गोटू सोनवणे,सरलाबाई सोनवणे,आशाबाई सूर्यवंशी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून यापैकी कैलास सोनवणे,रंजाबाई गोटू सोनवणे,जागृती गोटू सोनवणे,सरलाबाई सोनवणे,या चार जणांना अटक केली आहे.पोलीस निरीक्षक शेख शकील, उपनिरीक्षक शरद रोडगे, संदीप चव्हाण, योगेश झाल्टे, सुभाष पवार,प्रदीप पवार,वैशाली सोनवणे महिला गृह रक्षक दलाच्या आशाबाई पाटील,आदी पुढील तपास करत आहे.
0