मतपत्रिका चोरी प्रकरण ; दोन दिवसात संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास निवडणूक अधिकार्‍याला काळे फासू – धनराज गुट्टे

संबंधित अधिकारी यांना बडतर्फ करण्याची मागणी

वागळे:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्य फार्मसी काँन्सिलच्या सिन्नर येथे निवडणूकी दरम्यान मतपत्रिका चोरी प्रकाराची निवडणूक अधिकारी यांना संपूर्ण माहिती असताना सामान्य मतदार आणि उमेदवार यांना मतदान प्रक्रियेच्या पारदर्शिकतेबद्दल संशय निर्माण झालेला असून मतपत्रिका आपल्या कार्यालयातून निघून जवळपास दहा दिवस झाले असताना देखील त्या संबंधित मतदारापर्यंत पोचलेल्या नाहीत. या अशा प्रक्रियेमुळे मतदान पद्धतीविषयी निर्माण झालेला संशय खात्रीत बदलतो कि काय ?
यासंदर्भात निवडणूक अधिकारी यांचेकडून उमेदवार किंवा मतदारांनी विचारलेल्या शंकांची उत्तरे न मिळणे, आलेल्या मोबाईल कॉल्सना सिद्ध न करणे वा स्वीकारणे या सर्व गोष्टी ह्या वरील प्रक्रियेला पूरक आहेत कि काय ? असे संभ्रम निवडणूक अधिकारी यांचे या कृतीमुळे सिद्ध होत आहेत. निवडणूक अधिकारी यांची भूमिका संदिग्ध वाटत आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी यांनी मतदान प्रक्रियेबद्दल एक सविस्तर खुलासा निष्पक्ष व वेळेत द्यावा अन्यथा या निवडणुकीला स्थगिती मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही सामान्य मतदारांकडून झाल्यास नवल वाटायला नको. निवडणूक अधिकारी यांचेकडून तीन दिवसा नंतरही या प्रकाराबद्दल कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सोमवारच्या आत संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास सर्व फार्मासिस्ट निवडणुक अधिकारी यांचे भोंगळ कारभारा बाबत आंदोलन छेडू व त्यांचे तोंडाला काळे फासू. या नंतर होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील असा इशारा भारतीय जनता पार्टीचे जनरल सचिव धनराज विक्रम गुट्टे यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते व राज्यपाल यांचेकडे संबंधित अधिकारी यांना बडतर्फ करण्याची मागणी देखील केली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.