अंबाजोगाई : परळी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख हे सातत्याने ग्रामिण भागातील गोरगरीब जनतेच्या हिताला प्राधान्य देवून त्यांच्या उपयोगी पडणारे नेतृत्व आहे.ग्रामिण भागातील विकासाचे विविध प्रश्न सोडवून घेण्यासाठी गोविंदराव यांनी सातत्याने आग्रहाची भूमिका घेवून तसे कार्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी परळी व केज विधानसभा मतदार संघात पक्षाला ताकद देण्याचे काम त्यांनी केले आहे.शिक्षण संस्था,विविध सांस्कृतिक तसेच साहित्यीक उपक्रमात त्यांचा सातत्याने सक्रिय सहभाग राहिला आहे. गोविंदराव देशमुख यांना उदंड,निरोगी दिर्घायुष्य लाभावे व त्यांच्या हातुन ग्रामिण भागातील जनतेची यापुढे ही अखंड सेवा घडावी अशी अपेक्षा बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केली.
परळी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईतील ‘विमलसृष्टी’ या ठिकाणी बुधवारी,दि.24 एप्रिल रोजी अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती राजेसाहेब देशमुख यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना वरील विचार मांडले. राजेसाहेब देशमुख यांनी यावेळी गोविंदराव देशमुख यांचा फेटा बांधुन,शाल,पुष्पगुच्छ व नांदेड येथून आणलेला भव्य असा पुष्पहार घालुन त्यांचा हृदय सत्कार केला. केक भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी गोविंदराव देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आ.पृथ्वीराज साठे,केज नगर पंचायतचे अध्यक्ष आदित्य पाटील,जिल्हा परिषद सदस्य संजय दौंड, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव उबाळे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सिरसाट, बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेभाऊ औताडे,अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हाणमंतराव मोरे,राहुल सोनवणे, पशुपतीनाथ दांगट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमर देशमुख, अंबासाखरचे संचालक दाजीसाहेब लोमटे, नगरसेवक बबनराव लोमटे,विजयकुमार देशमुख,नगरसेवक अशोक मोदी,रणजित लोमटे,गिरधारीलाल भराडीया,शांतीलाल सेठीया,रवी देशमुख, विद्याधर पांडे, बाळासाहेब जगताप आदींसहीत केज, परळी,अंबाजोगाई तालुक्यातील गोविंदराव देशमुख यांचा मित्र परिवार,नातेवाईक,
पञकार व मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.