आठवडा विशेष|ज्ञानेश्वर धोंड़ू पाटील
सोयगाव (औरंगाबाद) दि.१४: आगामी लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता कोणत्याही क्षणी घोषित होण्याच्या शक्यतेमुळे दोन लोकसभा मतदार संघात विभागलेल्या सोयगाव तालुक्याची निवडणूक पूर्वतयारी हाती घेण्यात आली आहे.याकामी आचारसंहिता पथके स्थापन करण्यासाठी निवडणूक विभागाकडून चाचपणी सुरु झाली आहे.
सोयगाव तालुक्याचा काही भाग कन्नड विधानसभा मतदार संघात विभागल्या असल्याने या मतदार संघाला औरंगाबाद(पूर्व)आणि सिल्लोड विधानसभा मतदार संघाचा भाग जालना लोकसभा मतदार संघाला जोडणी करण्यात आला असल्याने या दोन्ही मतदार संघासाठी आगामी काळात होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी सोयगाव तालुका सज्ज झाला असून त्यासाठी तालुका निवडणूक विभागाकडून पूर्वतयारी करण्यात आली आहे.जालना लोकसभेसाठी ५९ आणि औरंगाबाद(पूर्व)साठी ३९ मतदान केंद्रे असून यासाठी लागणारी कर्मचारी संख्या,लागणारा निवडणूक खर्च आणि आचारसंहिता पथकांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची चाचपणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.दरम्यान दोन्ही मतदार संघांसाठी आचारसंहितेचे सहा पथके कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे,यासाठी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विठ्ठल जाधव,सुधीर जहागीरदार,सचिन ओहोळ आदि निवडणूक विभागाचे कर्मचारी पुढाकार घेत आहे.
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक देयके रखडली
दरम्यान सोयगाव तालुक्यात झालेल्या नुकत्याच दोन वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे कर्मचाऱ्यांच्या मानधनापोटीचे सहा ते सात लाख रु मानधनाची रक्कम अद्यापही रखडली असून इंधनाचे देयकेही रखडली आहे.