पुणे:आठवडा विशेष टीम―किसान सभेच्या वतीने ओरिएंटल इंशोरन्स कंपनी समोर बुधवार ता.13 पासुन बेमुदत मुक्काम सत्याग्रह करत होते. सोमवारी (ता.19) आंदोलनाचा 7व्या दिवशी या आंदोलनास यश आले आहे अंदोलनामुळे ज्यांना यापूर्वी पीक विमा ओरिएंटल कम्पनी ने नाकारला होता त्यातील 30% शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली आहे व तसे एसएमएस शेतकऱ्यांना मिळत आहे.किसान सभेच्या व हजारो शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे 400 शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम टाकलेली आहे.फक्त ज्या शेतकऱ्यांनी दोन जागेवर पीक विमा भरला आहे आश्या शेतकऱ्यांला पीक विमा मीळनार नाही व इतर पुर्ण बीड जिल्ह्यातील लाखो शेतकर्यांचे पीक विम्याची रक्कम काही दिवसांतच खात्यांवर जमा होईल असे ओरेन्टल इन्शुरन्स कंपनी चे प्रबंधक मुर्ती सर यांनी आश्र्वासन लेखी स्वरूपात दिलेले आहे . तसेच पुण्यातील कॗषी आयुक्तां कार्यालयावर किसान सभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला शेतीच्या नुकसान भरपाई साठी सरकारने 8000 हेक्टर मदत जाहीर केली आहे ती मदत वाढीव करून मीळावी व ज्या शेतकऱ्यांचे 2018 चे ऊसाचे अनुदान मीळाले नाही आश्या शेतकऱ्यांना पण त्याचे पैसे खात्यात जमा होतील असी गव्वाही कॖषी आयुक्तांने दीली आहे , शेतकऱ्यांच्या एकजुटीमळे लाल बावटा मुळे आज बीड जिल्ह्यातील लाखो शेतकर्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
या आंदोलनात कॉ अजित अभ्यंकर काॅ.अजीत नवले काॅ.अजय बुरांडे काॅ.डाॅक्टर मोठे सर काॅ.दत्ता डाके काॅ.सुदाम शिंदे,विशाल देशमुख,भागवत देशमुख,अशोक डाके , डाॅ.महारुद्र डाके,ब्रम्हानंद देशमुख यांच्या सह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
0