पाटोदा (शेख महेशर): दुष्काळ म्हणजे पुढाऱ्यांसाठी फायदाच असतो टॅंकर, छावण्या दुष्काळाची कामे परंतु गोरगरिबांना रोजगार व पाण्यासाठी स्थलांतर करावे लागते.
पाटोदा शहरांमध्ये भयानक दुष्काळ पडलेला असताना शेजाऱ्याला थेंबभरही पाणी कुणी कुणाला देत नाही, अशा परिस्थितीमध्ये देखील गोरगरिबांचे कैवारी सय्यद फारूक उर्फ लल्लू शहा हे गेल्या ७ वर्षापासून स्वतःच्या बोरचे पाणी स्वतः लाईट बिल भरून कुणाचाा ही एक रुपयाा ही न घेता जनतेची प्रमाणिकपणे तहान भागवत आहेत. महात्मा फुलेंनी दुष्काळात स्वतःच्या विहिरीतील पाणी जनते साठी खुले केले होते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दुष्काळा मध्ये गोरगरिबांना पाणी देण्याचे काम ते करत आहेत. दिवसांत चार वेळेस ते बोअर चालू करून गरजूंना मोफत पाणी देतात, आजच्या ह्या स्वार्थी जमान्यात अनेक जण पाणी विकत आहेत परंतु पाटोदा शहरांमध्ये आज ही लल्लू शहा सारखे माणुसकीची जाण असणारे देखील आहेत. त्यांच्या बोअर मुळे महासांगवी रोड परिसरातील लोकांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे. नक्कीच त्यांना गोरगरिबांचे आशीर्वाद मिळतील अशी भावना परिसरातील लोक व्यक्त करत आहेत.