सोयगाव दि.२७ (ज्ञानेश्वर धोंडू पाटील): सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथील शेतकरी संजय लक्ष्मण पाटील शेती शिवार बहुलखेडा गट नं १६ यांच्या शेतातील ३०० मोसंबीची झाडे अज्ञात व्यक्तीने उध्वस्त केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान घडली असल्याचे शेतकरी संजय पाटील यांनी सांगितले आहे.
सदरील शेतकऱ्याने खूप काळजीपूर्वक या मोसंबी झाडांची ४ वर्ष जपवणूक केली होती. मात्र अज्ञात व्यक्तीकडून या प्रकारे झाडांचे व शेती उपयोगी साहित्य चे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून त्याच्या चार वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी वेळ सद्या या शेतकऱ्यावर आली आहे. तसेच शेतातील काही शेती उपयोगी साहित्य देखील विहीरीत फेकून दिले आहे.
सदरील घटनेचा अद्याप पंचनामा झालेले नाही असे शेतकरी संजय पाटील यांनी सांगितले आहे.