१४ व्या वित्त आयोग व ग्रामपंचायतला मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचे आदेश
तांबाराजुरी येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या चौकशीचे आदेश निघाले
पाटोदा (प्रतिनिधी): तांबराजुरी येथील तक्रारदार नितीन तांबे यांच्या तक्रारीनंतर बीड जिल्ह्यापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे यांनी संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांची १४ व्या वित्त आयोग व ग्रामपंचायतला मिळणाऱ्या इतर आर्थिक उत्पन्नातून केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरनी संबंधित तक्रारीनुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती पाटोदा यांना चौकशी करण्यासाठी व त्याचा अहवाल पाठवण्यासाठी सूचित करण्यात आले होते परंतु ह्या प्रकरणाची चौकशी अहवाल मिळाला नसल्याने संबंधित गटविकास अधिकारी यांना शिस्तभंगाची कार्यवाही का करू नये अशी नोटीस बजावली आहे.
विशेष म्हणजे,गटविकास अधिकारी पंचायत समिती पाटोदा यांना जिल्हापरिषद कडून वारंवार चौकशी संदर्भात पत्र पाठवून देखील चौकशी केलेली नाही ही गंभीर बाब आहे.वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे व नेमून दिलेल्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याच्या सबबीवर म.ना.से शिस्त व अपील नियम १९७९ मधील नियम ५ अन्वये आपणाविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही का प्रस्तावित करू नये व ३ दिवसात खुलासा मागवला आहे. अशी नोटीस गट विकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी दिली आहे.