आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.२९: पंचायत समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षण कामाच्या मोबदल्याचा धनादेश लाभार्थ्याच्या खात्यात जमा न होता अचानक गायब झाल्याचे उत्तर सोमवारी संबंधित लाभार्थ्याला मिळाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.त्यामुळे मानधनाचा धनादेश बँकेतून चोरी झाला कि गायब झाला याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे.
पंचायत समितीच्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याच्या कामाचा मोबदला शेख वासिम शेख गुलाब यांना मिळाला होता.परंतु मोबदल्याची रक्कम धनादेशाद्वारे मिळाल्याने लाभार्थ्याने हा धनादेश संबंधित बँकेत जमा केला असता,सोमवारी रक्कम खात्यावर जमा झाल्याची खात्री करण्यासाठी बँकेत गेला असता,बँकेकडून खात्यात रक्कम जमा झालेली नसून तुमचा धनादेशाही मिळाला नसल्याचे उत्तर मिळाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.दरम्यान बँकेत लाभार्थाने जमा केलेला धनादेश अचानक गायब झाला कि चोरी झाला याबाबत उलट सुलट चर्चा सुरु असल्याने सोयगावात बँकेच्या बाबतीत संभ्रम झाला आहे.दरम्यान याबाबत पंचायत समितीचा संबंधित विभाग काहीच प्रतिक्रिया देण्यास तयार नसून बँकेकडून केवळ धन्मादेश नसल्याचा खुलासा देण्यात येत असल्याने यातील गौडबंगाल मात्र कळू शकलेले नाही.