आठवडा विशेष | शेख महेशर
पाटोदा : नाळवंडी / कारेगाव येथील जानपीर माध्य.व उच्च.माध्य.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कदिराबानो सुलेमान शेख यांना म.ज्योतिराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य यांचा प्रतिष्ठीत राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार आज दि.२८/०४/ २०१९ रोजी मा.खा.ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या हस्ते व मा.आ.डी.के.देशमुख, मा.गणेश बजगुडे पाटील (प्रदेश कार्याध्यक्ष शिवसंग्राम संघटना), प्रदेशाध्यक्ष मा.व्यंकटराव जाधव, श्री यशवंत पन्हाळकर (सरपंच,नाळवंडी), जानपीर विद्यालयाच्या सर्व शिक्षक / कर्मचारी, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे प्रदान करण्यात आला, असुन सर्वस्तरातुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
श्रीमती कदिराबानो सुलेमान शेख यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात भरीव, लक्षवेधी व नेत्रदिपक कामगिरी केली असुन त्या जानपीर माध्य.व उच्च.माध्य. विद्यालय, नाळवंडी / कारेगावच्या उपक्रमशिल मुख्याध्यापिका म्हणुन कार्यरत आहेत. त्यांनी अनेक शालेय उपक्रमाचे यशस्वी आयोजन करताना होतकरु व वंचित विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यानी नाळवंडी / कारेगावच्या सरपंच असताना अनेक समाजपयोगी व विकासाभिमुख राजकीय कार्य केले आहे. श्रीमती शेख कदिराबानो सुलेमान यांच्या भरीव कार्याची दखल घेवुन म.ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती कदीराबानो यांचे संस्थेचे सचिव जे.एल.पठाण,आ. सुरेश(आण्णा)धस, युवा नेते जयदत्त धस, अॅड. जब्बार पठाण पत्रकार दयानंद सोनवणे, पोपट कोल्हे, चंद्रकांत पवार, भाऊसाहेब पवार, संजय सानप, समाज सेवक व पं.स.सदस्य विद्याधर येवले, सरपंच सरुबाई रायते यांनी अभिनंदन केले आहे.