आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.२९:शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गलवाडा ग्रामपंचायतीत स्थानिक समस्या सोडवितांना ग्रामसेवकाची अरेरावी आणि गावात एका प्रभागात नळ योजनेला कमी दाबाने येणाऱ्या पाण्याचा प्रलंबित प्रश्न ग्रामसेवकाने टंचाई परिस्थितीत सोडविण्यासाठी केलेला विलंब यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून ग्रामसेवकाच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त केला.दरम्यान यावेळी सरपंच सुरेखा तायडे यांनी दूरध्वनी करूनही संबंधित ग्रामसेवक तातडीने न आल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला होता.
गलवाडा गावातील स्थानिक प्रश्न संबंधित ग्रामसेवक सोडवीत नसून वेळ काढू धोरण राबवीत आहे.त्यातच गावाचं एका प्रभागात नल योजनेला कमी दाबाने व कमी पाणी येत असते वर्षभरापासून हा नळ योजनेचा प्रश्न प्रलंबित असून ग्रामसेवकाने अद्यापही या नल योजनेवर कोणत्याही उपाय योजना न राबविल्याने संतप्त ग्रामसेवकाविरुद्ध ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध केला.दरम्यान गलवाडा गावातील एक प्रभागात कमी दाबाने पाण्याचा पाणी पुरवठा होतो,ऐन टंचाई परिस्थितीत गावातील या प्रभागाला तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.परंतु धरणात पाणी असूनही संबंधित ग्रामसेवक निधीचा उपयोग करून या प्रभागातील पाणी प्रश्नावर उपाय योजना करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले व प्रश्न निकाली निघे पर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्णय घेतल्याने मोठा गोंधळ उडाला होता.ग्रामाद्थांनी ठोकलेले कुलूप सायंकाळ पर्यंत जैसे थे असल्याने सोयगाव पंचायत समितीच्या कोणत्याही विभागाने यावर लक्ष केंद्रित न केल्याने दिवसभर कामकाज बंद अवस्थेत होते,दरम्यान ग्रामस्थांच्या या दुष्काळी स्थितीतील पाणी प्रश्नावर लक्ष देण्यासाठी पंचायत समितीलाही वेळ नसल्याचे आढळून आले.त्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला होता.पंढरी इंगळे,गणेश देशमुख,ज्ञानेश्वर बावस्कर,रामकृष्ण इंगळे,संतोष इंगळे,गिरजाबाई औरंगे,अंजनाबाई मोरे,विमलबाई सोनवणे,मेघ देशमुख आदि ग्रामस्थांनी पाण्याचा प्रश्न निकाली निघेपर्यंत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून ठिय्या मांडला होता.