दवाखान्यातील रुग्णांच्या हस्ते हे ऑक्सीजन सिलिंडर वाटप
परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―
राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्यावतीने शहरातील पाच दवाखान्यात ऑक्सीजनचे मोफत सिलिंडर वाटप करण्यात आले.दवाखान्यातील रुग्णांच्या हस्ते हे ऑक्सीजन सिलिंडर वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्य संयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीरावभैय्या धर्माधिकारी, डॉ. अशोक मकर, डॉ. तुषार पिंपळे, डॉ. अशोक मंत्री, डॉ. सत्यप्रेम खाडे, डॉ. प्रितमकुमार घोबाळे, डॉ. रूपेश लोढा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद सिराज, मजूर सेवा सहकारी सोसायटीचे संचालक सुनील सिरसाट, अँड.प्रकाश मुंडे, विद्यार्थी आध्यक्ष जयदत्त नरवटे, रणजित सुगरे हे उपस्थित होते.ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.संतोष मुंडे यांनी आतापर्यंत परळी बस्थानक परिसरात स्वच्छता अभियान, 220 लोकांचे डोळ्याचे मोफत मोतीबिंदू शिबीर, दिव्यांगाना मदत व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले परंतु यावर्षी कोरोना विषाणुच्या फैलावामुळे व्यापक कार्यक्रम आयोजित करता येत नसल्याने या संकटकाळात एखाद्या रुग्णावरील उपचारास ऑक्सीजन सिलिंडरअभावी अडचण येवु नये यासाठी ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला.