आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.३०:निंबायतीसह रामपूर,न्हावीतांडा,निंबायती गाव,या चार गावांना ग्रामपंचायतीच्या वतीने होणारा पिण्याचा पुरवठा दुषित असल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.मंगळवारी आरोग्य विभागाकडून तातडीने पाण्याचे बमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे.दरम्यान याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
निंबायती ग्रामपंचायतीच्या वतीने चार गावांना होणारा पाणी पुरवठा दुषित आणि तुरटी विरहित होत आहे.दरम्यान ऐन दुष्काळात या चार गावातील तब्बल पाच हजार नागरिकांना दुषित पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याने या परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे.याबाबत मात्र ग्रामपंचायत प्रशासन अनभिज्ञ असल्याने पाच हजार नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने गाव परिसरात घबराट पसरली आहे.दरम्यान दुषित पाण्याने निंबायती परिसारत रोगांना विळखा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जरंडीच्या धिंगापूर धरणावरून थेट निंबायती परिसरातील चार गावांना हा पुरवठा होत आहे.ग्राम पंचायतीच्या पुरवठा यंत्रणेवर शुद्धीकरण न करता थेट गावाला पुरवठा होत असल्याने दुषित आणि पिवळसर तरंगाचे पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे.
चार आदिवासी तांडे मिळून ग्रामपंचायत-
दरम्यान निंबायती ग्रामपंचायत रामपुरातांडा,निंबायती,निंबायती गाव,न्हावीतांडा या चार तांडे मिळून ग्रामपंचायत असल्याने या चारही तांड्यांना दुषित पाणी पिण्यास मिळत आहे.आठवडाभरापासून पाण्याच्या दुषित प्रमाणात वाढ झाली असल्याने नागरिकांना रोगांना बळी पडावे लागत आहे.याप्रकरणी पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे.
पाच हजार नागरिकांना घ्यावे लागते विकतचे पाणी-
ऐन दुष्काळी स्थितीत निंबायती परिसरातील चार तांड्यातील पाच हजार नागरिकांची तहान विकतच्या पाण्यावर अवलंबून आहे.सर्वसामान्य मजुरांना विकतचे पाणी घेणे परवडत नसल्याने ऐन दुष्काळात पिण्याचं पाण्यासाठी मजुरीतून तरतूद करावी लागत आहे.