आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव : सोयगाव येथील जिल्हा परिषद शाळा व संत ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे शिक्षण घेतलेले मंगेश श्रावण कोळी (पवार) हे सद्या औरंगाबाद येथे पोलीस हेड कॉस्टेबल पदी कार्यरत आहे.ते एमपीएससी परिक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पास झाले.
सोयगाव जिल्हा परिषद शाळा येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करत व संत ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले मंगेश श्रावण कोळी(पवार) यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांचे वडील हे आर. सी. जैलर्स जळगांव येथे रोजंदारी करीत आहे. व कुटुंबाची परिस्थिती हलाकीची जरी होती तरी मंगेश कोळी यांची जिद्द व चिकाटीने मेहनत करीत औरंगाबाद क्रांती चौक पोलीस येथे पोलीस कॉस्टेबल पदांवर कामाची धुरा सांभाळत आहे व औरंगाबाद येथेच एम.पी.एस.सी पुर्ण तयारी केली व उत्तिर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली. सोयगावाचे केंद्र प्रमुख मोती जोहरे यांचे भाचे आहेत. पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल सोयगाव येथील अमोल निकम, कैलास पंडित, अतुल पाटील व सोयगाव मित्र मंडळ यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.