तेल्हारा: तेल्हारा तालुक्याला गेल्या दहा दिवसांत आत्महत्या सारख्या घटनांचे ग्रहण लागले असून आज पहाटे २८ वर्षीय युवकाच्या आत्महत्येने तेल्हारा शहरासह तालुका हादरला असून तालुक्यातील जनता तरुणांच्या आत्महत्येने अवाक झाली आहे.
तेल्हारा तालुक्यात गेल्या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये एकाच वयोगटातील पाच तरुणांच्या आत्महत्येने तालुका हादरला असून आज पहाटे तेल्हारा शहरातील शनी मंदिराजवळ राहणाऱ्या दीपक रमेश लासुरकर वय २८ वर्ष या युवकाने स्मशानभूमीला लागून असलेल्या शेतातील बाभडीच्या झाडाला गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आल्याने घटनास्थळी तेल्हारा वासीयांनी एकच गर्दी केली होती. जवळपास दहा दिवसांच्या कालावधीत पाच युवकांनी आत्महत्या केल्याने घटनास्थळी नागरिकांचे मन हादरून गेल्याचे स्पष्ट नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येते होते. तरुणांच्या आत्महत्ये सारख्या टोकाच्या भूमिकेमुळे तेल्हारा तालुका सतत घडत असणाऱ्या आत्महत्ये सारख्या घटनांमुळे सुन्न झाला आहे. दीपक हा मोल मजुरी करून आपल्या आई वडिलांना हातभार लावत होता. दीपक हा एकुलता एक असल्याने त्याच्या घरी दुःखाचा डोंगर कोसडला असून त्याच्या मागे आईवडील असा परिवार आहे. पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.