अंबड (प्रतिनिधी): जन क्रांती संघाच्या अंबड तालुका पदाधिकारीच्या वतीने मौजे शिरनेर गावातील दारू बंदी आणि गावासाठी तात्काळ पिण्याच्या पाण्याची टँकर चालू करावे यासाठी जन क्रांती संघ चे संस्थापक डॉ संदीप घुगरे यांच्या नेतृत्वाखाली 25 एप्रिल 2019 रोजी अंबड तहसीलदार यांना निवेदन देऊन शिरनेर गावाची दुष्काळ परिस्थितीमुळे गावावर आलेल्या संकटाची माहिती संघटना मार्फत अंबड तहसीलदार मार्फत जालना जिल्हाधिकारी यांच्या पर्यंत पोहविली या निवेदन ची जिल्हाधिकारी कार्यालय ने तात्काळ कारवाईचे करून शिरनेर गावासाठी दिनांक 1 मे रोजी गावासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करून गावाची टंचाई दूर केली यासाठी जेष्ठ समाजसेवक आप्पासाहेब वैराळ,जन क्रांती संघ अंबड तालुका संघटक किरण लिंगायत, महेश बघाटे, बळीराम गायके,किशोर घुगरे, सचिन घुगरे,योगेश गायके,अविनाश भोजने तसेच गावकऱ्यांनी परिश्रम घेऊन गावासाठी पाणी टँकर चालू केले. गावामध्ये पाणी टँकर आल्याने गावकऱ्यांनी आभार मानले.