राजकारणसामाजिक

मेंगडेवाडी ते वाघिरा रस्त्याचे डांबरीकरण करण्याची जनतेची मागणी

वाघिरा | प्रतिनिधी :

गेल्या १५ वर्षांपासून मेंगडेवाडीला जाण्यासाठी चांगला रस्ता नाही,कधी तलावाच्या पाण्यातून तर कधी दगडगोट्यातून मेंगडेवाडीकरांना वाट काढावी लागते.त्यांच्या मागणी कडे कायम दुर्लक्षच केले जात आहे.तरी प्रशासनाने व येथील नेतृत्वाने याकडे बारकाईने लक्ष देण्याची मागणी वाघिरा व मेंगडेवाडीच्या ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
वाघिरा ते मेंगडेवाडी हा रस्ता डांबरीकरण स्वरूपात व्हावा जेणेकरून पुढील बरीच वर्षे हा रस्ता चांगला टिकेल.पावसाळ्यात मेंगडेवाडी परिसरातील शाळकरी मुले ह्याच रस्त्याने ये-जा करतात त्यामुळे याकडे लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर डांबरी रस्ता करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

(वाघिरा ,पाटोदा जि बीड)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.