पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

पाटोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रकरण ; आ.सुरेश धस यांच्या यशस्वी मध्यस्ती नंतर पाटोदा बंद मागे

पाटोदा दि.०२: पाटोदा शहरातुन जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान शहराती छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी असलेला चबुतरा काढण्यात आला होता, हा चबुतरा याच ठिकाणी पुर्ववत बांधण्यात यावा या मागणीसाठी शहरातील शिवप्रेमींनी गुरुवारी पाटोदा बंद ची हाक दिली होती , दरम्यान आ: सुरेश धस यांनी सकाळीच शहरात दाखल होत शिवप्रेमी व प्रशासन तसेच हायवे ऑथोरिटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन हा चबुतरा याच जागी कायम ठेवा अशी मागणी केली, त्यानंतर याच जागी चबुतरा कायम राहील असे आश्वासन प्रशासनाने दिले व आ. धस यांच्या यशस्वी मध्यस्तीनंतर हा बंद मागे घेण्यात आला.

शहरातुन अहमदपुर - अहमदनगर व पैठण पंढरपुर असे दोन राष्ट्रीय महामार्ग जात असुन छत्रपती शिवाजी महाराज चौकात चबुतरा पहील्याप्रमाणेच तयार करावा या मागणी साठी शिवप्रेमींनी एकत्र येत आंदोलनाचा इशारा देऊन पाटोदा बंदची हाक दिली होती, गुरुवारी सकाळी आ. सुरेश धस यांनी शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमी आंदोलकांशी चर्चा केली व त्यानंतर तात्काळ उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, हायवे चे अधिकारी अभंग , कंत्राटदार हुले, यांच्याशी चर्चा करून चबुतरा पुर्ववत बांधण्यासाठी मध्यभागी जागा सोडण्याची सुचना केली, ही मागणी लगेचच मान्य झाल्यांनंतर आ. सुरेश धस यांच्या हस्ते त्या ठिकाणी चबुतऱ्याचे भुमिपुजन करण्यात आले व आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले, या प्रसंगी तहसिलदार रुपा चित्रक, नायब तहसिलदार गणेश जाधव, पोलीस निरीक्षक एस. जे. माने यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व शिवप्रेमी नागरीकांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.