महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून साजरा केला वृक्षांचा वाढदिवस
आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.०२:येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात गतवर्षी महाराष्ट्र दिनी लावलेल्या ३५० हुन अधिक वृक्षांचा लागवड करण्यात आली होती.त्या वृक्षांचे मागील एका वर्षापासून जतन व संवर्धन करून ते वृक्षे एका वर्षाचे झाले त्यांचा प्रथम वाढदिवस तहसीलदार श्री प्रवीण पांडे यांनी प्रातिनिधिक एका वृक्षाचे पूजन करून साजरा केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक नाईकवाडे, उपप्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, पोलीस निरीक्षक शेख शकील, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सपकाळ साहेब, श्री मिसाळ साहेब, श्री फुसे साहेब, श्री नायब तहसिलदार श्री जाधव साहेब, श्री संजय शहापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुन्हा वृक्ष लागवड करण्यात आली आहे.वृक्षांचा वाढ दिवस साजरा करताना प्रारंभी प्राचार्य डॉ अशोक नाईकवाडे यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. तहसीलदार श्री प्रवीण पांडे यांनी मी वृक्षांचा वाढदिवस साजरा करणारा उपक्रम प्रथम पहिला व खरच हा स्तुत्य उपक्रम आहे.यामुळे केवळ लोक वृक्ष लावून थांबनार नाही तर त्यांचे संवर्धन करतील असे स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
सूत्रसंचालन डॉ पंकज शिंदे यांनी,आभार प्रा.गोविंद फड यांनी मानले.कार्यक्रमासाठी डॉ.सुशील जावळे,कार्यालयीन अधीक्षक पंकज साबळे,डॉ.दीपक पारधे,डॉ शंतनू चव्हाण,प्रा विनोद चव्हाण,प्रा अन्वर सय्यद आदींनी परिश्रम घेतले.महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी, गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.