मुंबई दि.23 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात ,’ स्वातंत्र्य संग्रामाला ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असा हुंकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिला. आपल्या विद्वत्तेने आणि प्रखर पत्रकारितेने लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिश राजवटीला हादरे दिले. त्यासाठी अनेकदा तुरुंगवास भोगला. त्यांच्या त्याग,समर्पण आणि लढवय्येपणामुळे आपण आज समृद्ध, बलशाली राष्ट्राचे स्वप्न पाहू शकतो. लोकमान्य टिळक यांच्या विचारांना आणि स्मृतींना विनम्र अभिवादन!