पाटोदा:आठवडा विशेष टीम― दिनांक ५ जून रोजी पाटोदा येथील प्रतिष्ठित व्यापारी कांकरिया क्लास सेंटरचे मालक निखिल कांकरिया यांनी त्यांचा मुलगा वीर च्या वाढदिवसानिमित्त गरजू गरीब वंचित मसनजोगी वस्तीवरील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला .यावेळी शाळेच्या शिक्षिका सुरेखाताई खेडकर यांचा देखील वाढदिवस संयुक्त केक कापून सर्व विद्यार्थी च्या उत्साही वातावरणात साजरा केला यावेळी निखिल कांकरिया यांनी माणुसकीची भिंतीला ११०० रुपये मदत केली . यावेळी ३०विद्यार्थ्यांना वही ,पेन, कंपास शैक्षणिक साहित्य देण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन माणुसकीची भिंत यांनी केले होते. यावेळी उपस्थित युवा नेते युवराज जाधव ,त्रिमूर्ती मंडप चे मालक पप्पू शेठ जाधव , हजारे, आकाश ,अजय शिरवटे ,सरपंच व माणुसकीची भिंतचे दत्ता देशमाने, रामदास भाकरे उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी सर्व बालगोपाळांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.