सोयगाव दि.०३:सोयगाव तालुक्यात पाटबंधारे विभागाच्या अकरा धरणांपैकी केवळ सोयगावच्या वेताळवाडी धरणात २४ टक्के जलसाठा शिल्लक असून तब्बल दहा धरणे मृतसाठ्यावर येवून ठेपली असतांना त्यापैकी पाच धरणे बिलोसील झाली आहे.यामुळे सोयगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असूनही तालुका प्रशासन मात्र उपाय योजनांवर ठोस नसल्याने तालुकावासीयांची चिंता वाढली आहे.
पाटबंधारे विभागाची सोयगाव तालुक्यात अकरा प्रमुख धरणे आहे.या अकरा धरणांवर तालुक्याची तहान भागात असतांना यंदाच्या वर्षी मात्र तब्बल दहा धरणे मृतसाठ्यावर येवून ठेपली असून त्यापैकी पाच धरणे बिलोसील झाली आहे.त्यामुळे पाण्याचे गंभीर दुर्भिक्ष निर्माण झाले असतांना तालुका प्रशासन मात्र ठोस उपाय योजना करण्यासाठी पुढे आलेले नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.सोयगावसह आमखेडा,गलवाडा,वेताळवाडी,शेंदुर्णी ता,जामनेर या पाच गावांची तहान भागविणाऱ्या वेताळवाडीच्या धरणात दुहेरी आकडा गाठणारी पाणी पातळी असून यामध्ये पाच धरणे मृतसाठ्यावर असून पाच धरणात बिलोसील झाल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने ही धरणे सील करण्यात आली आहे.दरम्यान जंगलातांडा धरण कोरडेठाक झाल्याने या धरणाच्या खोलवर भागात चक्क भेगा पडल्याने सोयगाव तालुक्याची दुष्काळाची दाहकता गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे.
जनावरांच्या पाण्याची चिंता-
दरम्यान सोयगाव तालुकुयातील प्रमुख धरणे कोरडीठाक झाल्याने जनावरांच्या पाण्याची चिंता वाढली असून जनावाराना तहान भागविण्यासाठी पायपिट करण्याची वेळ आली आहे.
जंगलातांडा पाणी टंचाईवर पर्याय निघेना-
दरम्यान जंगलातांडा आणि जंगला गाव या दोन गावात पाणी टंचाईने रौद्ररूप धारण केले असून यावर उपाय योजनांसाठी प्रशासनही थकले आहे.या गावात टँकरचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आल असून,मात्र पाण्याचा स्रोतच उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र देण्यात तालुका प्रशासन अपयशी ठरल्याने या दोन्ही गावातील १५६० ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी कोसो मैल भटकंती करावी लागत आहे.दरम्यान पंचायत समितीच्या विभागाने अधिग्रहण केलेल्या दोन कुपनलिकापैकी एक कुपनलिका कोरडीठाक झाल्याने आणि दुसर्या कुपनालीकेवर गावांना पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांना तहनेलेले राहावे लागत आहे.