पाटोदा दि.२३(प्रतिनिधी): पाटोदा तालुक्यातील पारनेर ग्रामपंचायत अंतर्गत येणारी कुटेवाड़ी येथे जि.प.समाजकल्याण बीड यांनी सात लक्ष रूपये निधी चे समाजमंदीर बांधण्यासाठी निधी दिला होता परंतु कुटेवाडी येथे समाजमंदीर बांधण्यात आले नाही त्यातील काही निधी काम न करताच उचलण्यात आला.तसेच रस्ता, पथदिवे, विहरीचे पैसे काम न करताच उचलले गेले त्याकरता तहसिलदार,मा. मुख्याधिकारी, मा.समाजकल्याण, गटविकास अधिकारी, पोलीस स्टेशन पाटोदा यांना निवेदन देण्यात आले आहे.
या कामात ज्यांनी अपहार केला असेल त्यांच्यावर त्वरीत गुन्हे दाखल करूण त्यांच्या कडून व्याजा सहीत पैसे वसुली करण्यात यावेत नसता दि.०३ मे २०१९ रोजी कार्यालयासमोर चिंध्या-गोधड्याचे समाजमंदीर बांधुन तिव्र आंदोलन करणार असा पंढरी यादव, खंडू यादव,अभिमान यादव, विष्णू यादव, नागनाथ यादव, नाना यादव, रामा पंड़ागळे, सोमनाथ यादव यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
0