अंबाजोगाईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची चनई तांडा शिवारात कारवाई ;१ लाख २ हजार रुपयांची दारू केली नष्ट

अंबाजोगाई : शहरालगतच्या चनई तांडा शिवारात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी केंद्रांवर शनिवार,दि.4 मे रोजी राज्य उत्पादन शुल्क,अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 1,02150/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने
गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत.आता पर्यंत दहा ते अकरा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला.तसेच अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी,केज, माजलगाव,धारूर, परळी,अंबाजोगाई हे सहा तालुके येतात त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अवैध दारू विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.याच कारवाई अंतर्गत चनई तांडा शिवार (ता.अंबाजोगाई) या ठिकाणी अवैध हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून 2 गुन्हे नोंदवले.सदर ठिकाणी आरोपी मिळून न आल्याने महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले.
टाकलेल्या धाडीत 4545 लिटर रसायन,30 लिटर तयार हातभट्टी दारू,23 लोखंडी बॅरल,3 डब्बे,3 टोपली असा एकूण 1,02150/-(एक लाख दोन हजार एकशे पन्नास रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तो तात्काळ जागेवरच नष्ट करण्यात आला.या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,जवान बि.के.पाटील,आर ए.जारवाल,एस.व्ही. लोमटे व वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.