अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत रविवारी प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांचे जाहिर व्याख्यान

अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथील जिवक प्रतिष्ठाण, अंबाजोगाई यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांचे जाहिर व्याख्यान आज रविवार,दि.5 मे रोजी सायंकाळी 6 वाजता लोकनेते विलासराव देशमुख सभागृह,नगरपरिषद अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आले आहे.तरी या व्याख्यानास शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक डॉ.राहुल धाकडे यांनी केले आहे.

व्याख्यानाचा विषय- “बहुजन समाज आणि राजकीय साक्षरता" असा आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुजीब काझी हे असून यावेळी प्रा.एस.के.जोगदंड, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,अ‍ॅड.सुनिल सौंदरमल या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निमंत्रक डॉ.राहुल धाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अनंत कांबळे, भिमाशंकर शिंदे, विश्वास चोबे,रविंद्र केंद्रे,प्रा.विष्णु कावळे, डॉ.देवराव चामनर, डॉ.विनायक गडेकर, संतोष बोबडे, डॉ.विकास जाधव, डॉ.प्रमोद समुद्रे, प्रियदर्शी मस्के,अतुल ढगे,दिपक गुळभिले, सचिन राठोड आदींसहीत संयोजन समितीने पुढाकार घेतला आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.