जळगाव जिल्हापाचोरा तालुका

पाचोरा :सेवानिवृत्त जवान गणेश साळुंखे यांच्या सत्काराचा कार्यक्रम संपन्न

'आई-बाबांची सेवा करा !' सत्कार प्रसंगी जवानाचे उदगार

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील साजगाव बिल्ली येथील गणेश उत्तम साळुंखे या सेवानिवृत्त जवानाचा सत्काराचा कार्यक्रम पाचोरा येथील तलाठी कॉलनीतील शाहूनगर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक आबालवृद्धांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
गणेश साळुंखे या जवानाने अखंड २४ वर्षे भारतीय सेनादलात सेवा बजावून हवालदार पदावरून सेवानिवृत्त झाले. यावेळी साजगाव बिल्ली येथील अनेक तरुण मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात रेल्वे स्टेशन वरून निघून, शिवाजी चौकात येऊन, जवान साळुंके यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. दुपारी बारा वाजेच्या दरम्यान शिवाजी चौकातून आपल्या मित्रमंडळी सह जवान साळुंखे हे दोन किलोमीटरचे अंतर पायी चालत आले. यावेळी त्यांची धर्मपत्नी विजया साळुंखे ह्या पण सोबत होत्या.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे प्रा. भागवत महालपूरे, माजी सैनिक जळगाव जिल्हा संघटना अध्यक्ष बाळू पाटील भगवान पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून, जवान गणेश साळुंके यांनी प्रथम आपल्या आई वडिलांचा सत्कार करून त्यांचे दर्शन घेतले. यावेळी श्रोत्यांचे डोळे पाणावले होते. मनोगत व्यक्त करताना गणेश साळुंखे म्हणाले की, जीवनात आल्यानंतर प्रत्येकानं नोकरी अथवा कुठलाही व्यवसाय असो. शेती व्यवसाय का होईना, हे करत असताना, आपल्या म्हातार्‍या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना त्रास होईल असं वागू नका. शेवटपर्यंत त्यांचा सांभाळ करा. असे भावनिक आवाहन यावेळी साळुंके यांनी केले. यावेळी प्रशासनाने मात्र पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. यावेळी मधुकर काटे, प्रा. भागवत महालपूरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डी. आर. वाघ व उत्तमराव मनगटे यांनी केले व उपस्थित मध्ये शिवलाल वाघ, युवराज पाटील, प्रल्हाद वाघ, ज्ञानेश्वर युवरे, डाॅ. परदेशी, आप्पा पाटील, जावेद हवालदार, चावदस भोई, सर्जेराव गवळी, नारायण आघार्डे आदी.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.