पाटोदा: तालुक्यातील वाघिरा ते मेंगडेवाडी रस्ता कित्येक दिवसांच्या मागणींनंतरही झालेला नसल्याकारणाने वाघिरा गावसह मेंगडेवाडीकरांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्काराची हाक दिली आहे.गावातील युवक,सामाजिक कार्यकर्ते,ग्रामपंचायत सदस्य,गावातील रहिवाशी असलेले तालुकास्तरावरील नेते यांनी वेळोवेळी जसे जमेल तसे मंत्रालय गाठून रस्त्यासाठी पाठपुरावा केला परंतु त्याचा कसलाही परिणाम प्रशासन व सत्ताधारी नेते मंडळी यांच्यावर झाला नाही.गेली १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून येथील जाणता रस्त्याच्या प्रश्नावर ठाम आहे.गेल्या २ वर्षांपासून मंत्रालयात रस्त्याच्या कामासाठी जनता पत्रव्यवहार देखील करत आहे परंतु अद्यापही रस्त्याच्या कामाला मंजुरी दिलेली दिसत नाही ही खूप दुर्दैवी बाब आहे.
पावसाळ्यात तर हातभार चिखलातुन शालेय विध्यार्थी जातात.आरोग्याचा प्रश्नही रस्त्यामुळे दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.स्वातंत्र्य काळापासून असलेल्या ह्या रस्त्याच्या मागणीला खरच शासन मान्य करेल का ? असा प्रश्न देखील समोर येत आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी जर महाराष्ट्र शासनाने ह्या रस्त्याचा प्रश्न जर सोडवला नाही तर वाघिरा गावातील जनता मेंगडेवाडीकरांना सोबत घेऊन निवडणूकिवर बहिष्कार टाकणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.