मांजरसुंबा: चौसाळा येथील बसस्थानकामध्ये असलेल्या शौचालय गेल्या ४ महिन्यापूर्वी डागडुजी करण्यासाठी बंद करण्यात आले आहे. ते अद्यापपर्यंत उघडण्यात आले नसल्याने प्रवाशी व नागरिक मुक्तपणे बसस्थानकाच्या चारी बाजूंनी लघुशकेला जात आहेत. त्यामुळे येथील प्रवाशी व नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच महिला व शाळा, कॉलेजसाठी चौसाळा येथे शाळा, महाविद्यालयात ग्रामीण भागातून येत असलेल्या महिला मुलींची कुचंबना होत असून बसस्थानकाची दूरावस्था झाल्याने या ठिकाणी कोणी थांबण्यासह तयार नसते.
बसस्थानकामध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध नाही, कारण की या ठिकाणी असलेल्या सर्व फरशा, कडापे काढून ते अर्धवट सोडून गुत्तेदाराने पोबारा केला आहे. त्या मुळे वयोवृद्ध महिला नागरिकाना उभा रहावे आहे, गुत्तेदाराने काम अर्धवट का ठेवले हा सामान्यांना पडलेला प्रश्न आहे. चौसाळा तालुक्यातील मोठे गाव आहे. मात्र या ठिकाणाहून एकही बस नाही. दिवसभरात ८ ते १० बस येतात, काही बस चौसाळा बसस्थानकात न येता बाहेरू रून बायपासवरून निघून जात आहेत. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून येथील बसस्थानकाची दुरूस्ती करून प्रवाशांच्या सेवेसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.