अकोट: मुंडगाव ते लोहारी या दोन गावांना जोडणारया रस्त्याची महत्वाच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्यांनमुळे या रस्त्यावर वाहन चालवितांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.मुंडगाव ते लोहारी मार्गाने अकोटला जाण्यासाठी एक लहान पर्यायी मार्ग आहे. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून या मार्गावर दिवसभरात मोठया प्रमाणात वाहतुक सुरू असते. रस्त्यावरील जीवघेण्या खड्यांनमुळे या मार्गावर दररोज अपघातात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारयांनी या रस्त्याच्या दुरावस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याचे काम त्वरीत सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गासह ग्रामस्थ मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.