सोयगाव,ता.२२:आठवडा विशेष टीम―सोयगावकडून माळेगाव(पिंपरी)ता.सोयगाव कडे जातांना कंकराळा गावाजवळ अचानक मोटार सायकलचे टायर फुटल्याने मेंदूला मार लागून उपचारादरम्यान घेवून जातांना नेरी ता.जामनेर गावाजवळ एकाचा मृत्यू झाला आहे.मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला.
अजय सुभाष मोरे(वय २६)रा.माळेगाव पिंपरी असे मृत तरुणाचे नाव असून आठवडे बाजार करून सोयगावकडून माळेगावकडे मोटार सायकल वर जातांना कंकराळा गावाजवळील नाल्याजवळ त्याच्या मोटार सायकलचे अचानक टायर फुटून त्याचा मृत्यू झाला आहे.रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या दगडांच्या ढिगार्यावर आदळून त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली.यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी त्याला जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले असता,त्याला वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले.त्याच्या पश्चात आई,पत्नी.भाऊ असा मोठा परिवार आहे.
0