ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

सचिन सावंत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; 'मुंडे,महाजन' यांच्याबद्दलच वक्तव्य पडले महागात

मुंबई: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिवंगत गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट केली होती.परंतु मुंडे समर्थकांमध्ये पसरलेल्या असंतोषामुळे त्यांनी ती ट्विट डिलीट केल्याचे समोर येत आहे.लोकसभेच्या निवडणूका चालू असताना सामाजिक शांतता भंगाचा प्रकार काँग्रेस प्रवक्त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केल्याचे समोर येत आहे.

काँग्रेस प्रवक्ते सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर "महात्मा गांधी,इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी गेले.....महाजन आणि मुंढे कशासाठी गेले?" अशा प्रकारचे संतापजनक वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

स्व.प्रमोद महाजन व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे समर्थक ह्या ट्विट मुळे खूप संतापले आहेत.सर्व स्थरावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा निषेध व्यक्त केला जात आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.