पाटोदा (प्रतिनिधी): गडचिरोलीचे, कुरखेडा कोरचीमार्गावर जाभुळखेडा जवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले. या घटनेला कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे हे जबाबदार आहे. दादापुर येथे नक्षलवाद्यांनी वाहनाची जाळपोळ केली होती, या घटनेचा पंचनामा करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे हे दादापुर येथे गेल्या नंतर त्यांनी या १५ मनकांच्या हद्दीच्या बाहेर असलेल्या दादापुर येथुन ते जाऊन आल्यानंतर पुन्हा शिघ्रकृती दलाच्या जवानाना पाठविण्यात आले मात्र जवानांच्या सुरक्षतेची कोणतीही दक्षता घेण्यात आलेली नाही. यात महत्वाचे – म्हणजे कोणत्याही परिसरात नक्षल्यांनी आपप्रकार केला तर त्या घटनास्थळी जाण्यापूर्वी परिसरातील २० ते २५ कि.मी. भागात तपासणी केली जाते, पोलीसाच्या भाषेत याला रोड ओपनिंग असे म्हणतात.
उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे हे वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जवानांना पोलीस वाहन नसल्याने खासगी वाहनातुन प्रवास करण्यास भाग पाडले. दादापुर येथे या १५ सैनिकांना पाचारण करण्यापुर्वी बॉम्बशोध पथकवाहन पुढे असणे गरजेचे आहे माहित असताना उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आपल्या पदाचा दुरपयोग करुन बेकायदेशीर पणे आदेश देऊन त्या १५ सैनिकांच्या मृत्युस ते कारणीभूत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांची चौकशी करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, व त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.व १५ शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयाना न्याय द्यावा असे पाटोदा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर शेख असिफ (शहिद जवानाचे भाऊ), सय्यद फय्याज, शेख अन्सार, विजय बिनवडे, शेख मुबिन, शेख मूज्जू, सय्यद साजेद, शेख आसिफ इत्यादींच्या सह्या आहेत.