अकोला : सोमवारी सकाळी स्थानिक जिल्हा उपनिबंधक कार्यालयात झालेल्या हत्येच्या प्रकरणात आरोपींची नावे समोर आलेआहेत.मात्र आरोपी फरार असल्याने त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. माजी महापौरासह तीन महिलांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.मुर्तीजापुर मार्गावरील जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये सोमवारी सकाळी अकोल्यातील प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाल्याची घटना समोर आली.या घटनेने संपूर्ण अकोल्यात एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर काही वेळातच ही हत्या सेवानिवृत्त एपीआय श्रीराम गावंडे,छोटू गावंडे,मुन्ना गावंडे,रंजीत गावंडे व इतर पंधरा ते वीस लोकांनी मिळून केल्याची माहिती समोर आली.परंतु आरोपी घटनेनंतर लगेच फरार झाल्याने त्यांच्या शोधासाठी पोलीस दलातील विविध पथके गठीत करण्यात आली असून ही सर्व पथके विविध ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.
घटनेनंतर पोलिसांनीगावंडे परिवाराच्या घरी छापा टाकला.या कारवाईमध्ये पोलिसांनी माजी महापौर सुमन गावंडे यांच्यासह तीन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे संपूर्ण अकोल्याचे लक्ष लागून आहे.