अकोला: दिनांक 6 मे रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनामध्ये विविध विषयाबाबत सर्व विभागाचे खाते प्रमुख यांचा आढावा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी घेतला.
यावेळी सभेमध्ये बांधकाम विभागाने रस्ते मॅपिंग प्रगती अहवाल वेळोवेळी सादर करणे व बांधकामाचे अटी व शर्तीचे उलघण केल्यामुळे कंत्राटदार यांचे कडून दंड वसूलीबाबतचा प्रगती अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे सादर करणे , समाजकल्याण विभागाने दलितवस्ती मॅपिंग प्रगती अहवाल वेळोवेळी सादर करणे , सर्व विभागाने सर्व योजनेचे उपयोगीता प्रमाणपत्र दिनांक 8 मे पर्यंत सादर करणे.सर्व विभागाने सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीचा अहवाल दिनांक 8 मे पर्यंत जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेकडे दिनांक 8 मे पर्यंत सादर करण्यात यावा . तसेच सर्व विभागाने 53 कोटी वृक्ष लागवडीचे खड्डे दिनांक 10 मे पर्यंत पूर्ण करणे100 टक्के फोटो अपलोडिंग करणे . मान्सूनपुर्व पाणी नमुने उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करणे व इतर विषयाबाबत सखोल व विस्तृत आ ढावा विलास खिल्लारे सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला .
यावेळी आढावा सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जगदीश मानमोठे , बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.सोनवणे , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे , शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ . वैशाली ठग , कनिष्ठ प्रशासन अधिकारी संतोष पाटील , स्वीय सहाय्यक राजेंद्र भटकर , कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय उंबरकार , क्रणारायन , श्रीमती चंदन , खारोडे , मसराम , शाहू भगत जनसंपर्क अधिकारी यांचेसह सर्व विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती