अंबाजोगाई (प्रतिनिधी): केंद्रिय शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर्फे मार्च-2019 महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल सोमवार,दि.6 मे रोजी दुुपारी बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झाला.त्यात येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूलने दहावी सी.बी.एस.ई. बोर्ड (इंग्रजी माध्यम) परीक्षेत सलग आठव्या वर्षीही 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.या संस्थेचे सर्वच्या सर्व 114 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अंबाजोगाई येथे राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकार्यांनी 2004 साली श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाने इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणार्या शाळेची स्थापना केली. या शाळेने सलग आठव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. मार्च-2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत संस्थेच्या सर्वच्या सर्व 114 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत नवा उच्चांक निर्माण करून पुन्हा एकदा अंबाजोगाईचे नांव शैक्षणिक क्षेञात उंचावले आहे.बीड जिल्ह्यात या शाळेच्या
29 विद्यार्थ्यांनी
90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले.तर विशेष प्राविण्य प्राप्त 18 विद्यार्थी व प्रथम श्रेणीत एकुण 67 विद्यार्थी असे सर्व मिळून 114 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेतून प्रथम येण्याचा बहुमान वैष्णवी मस्के (98 टक्के) या विद्यार्थीनीने पटकावला तर संस्थेत द्वितीय समिक्षा तापडीया (97.2टक्के) व तृतीय प्रणाली लगसकर (97 टक्के) हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय आले आहेत.न्यू व्हिजन पब्लिक स्कुलचे पहिले आकरा टॉपर व इतर उत्तीर्ण विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. त्यात वैष्णवी मस्के (98 टक्के),समिक्षा तापडीया(97.2 टक्के), प्रणाली लगसकर (97 टक्के),आचार्य वैष्णवी (96.2 टक्के),रेवती राठोड (96.2 टक्के), प्रकृती शेट्टी (95.8 टक्के),जयंत पिसाळ (95.8 टक्के),आर्यन आरसुडे (95.6 टक्के), सानिष गावडे (95.4 टक्के),अनुराग गिल्डा (95.4 टक्के),सुशांत मस्के (95.4 टक्के), दृष्टी बाहेती (94.4 टक्के),जानव्ही राऊत (93.6 टक्के),स्वरूप खडके (93.6 टक्के), गौरी पाटील (93.4 टक्के),राजदीप माने (93.2 टक्के),शिवानी शेटे (92.6 टक्के),विश्वा लोमटे (92.2 टक्के), साक्षी पवार (92 टक्के),इशीता लोहिया (91.8 टक्के),निखील निर्मळ (91.6 टक्के), ऋषीकेश लांडगे (91 टक्के),आदिती व्यास (90.8 टक्के),आदित्य हावीनाळ (90.8 टक्के),अभिषेक मुंडे (90.6 टक्के),संस्कृती बैरागी (90.6 टक्के), तानाजी ढवळे (90.6 टक्के),शिवम भन्साळी (90 टक्के),अंकीता दौंड (90 टक्के) हे 29 विद्यार्थी 90 टक्क्यांवरील आहेत. तसेच मराठी या विषयात प्रणाली लगसकर,अभिषेक मुंडे व अक्षय मुंडे या विद्यार्थ्यांना तर सामाजिक शास्त्र या विषयात वैष्णवी मस्के या विद्यार्थीनीला 100 पैकी 100 गुण प्राप्त झाले आहेत.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, प्राचार्य डॉ.बी.आय. खडकभावी,प्रा.
वसंतराव चव्हाण, डॉ.डी.एच.थोरात, प्रा.नानासाहेब गाठाळ, दिनकर जोशी, डॉ.विवेकानंद राजमाने, प्रा.सुरेश बिराजदार, संस्थेचे अध्यक्ष भुषण मोदी व सर्व शिक्षकवृंद आदिंनी अभिनंदन केले आहे.
न्यु व्हिजन म्हणजे दर्जेदार इंग्रजी शिक्षण -राजकिशोर मोदी
अंबाजोगाईत मुंबई,पुणे,नागपुर व औरंगाबादच्या धर्तीवर इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी न्यू व्हिजन पब्लिक स्कूल सुरू केले.सतत आठ वर्षे 100% निकालाची परंपरा कायम ठेवून संस्थेने गुणवत्ता जोपासली आहे.आज या संस्थेचे माजी विद्यार्थी हे देशात व परदेशात मोठमोठ्या पदांवर काम करीत आहेत.ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक क्षेञात अंबाजोगाई पॅटर्न निर्माण केला आहे.नर्सरी.,एल.के. जी.,यु.के.जी.,पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते.अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास, सुसज्ज ग्रंथालय, ऑडिओ व्हिज्युअल क्लासरूम,अत्याधुनिक प्रयोगशाळा,वायफाय परिसर,भाषा विषयक प्रयोगशाळा,गणित व विज्ञान प्रयोगशाळा,ई-लर्निंगद्वारे प्रशिक्षण, प्रत्येक वर्गात सिसिटीव्ही कॅमेरा, कला,हस्तकला,नृत्य, संगीत,कराटे प्रशिक्षण, पुर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी आद्ययावत इमारत बास्केट बॉल ग्राउंड, प्रशस्त क्रिडांगण,स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंञ वर्ग या सोबतच सुसज्ज वसतीगृह,प्रत्येक खोलीत प्रसाधनगृह, प्रत्येक खोलीत चार विद्यार्थी,संतुलित व पोषक आहार,दैनंदिन योगा आणि व्यायाम. सकाळी व संध्याकाळी अभ्यासवर्ग,अनुभवी व काळजीवाहक कर्मचारी वृंद,लाँड्री सुविधा, मुलींसाठी स्वतंञ सुविधा (CCTV खाली देखरेख),24 तास वैद्यकिय व विद्युत सुविधा यासोबतच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत,स्पर्धेत विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे याकरीता जे-जे करता येईल ते सर्वच
सर्वोत्कृष्ट देण्याचा आमचा प्रयत्न आसल्याचे सांगुन गतवर्षी पासून संस्थेने सीबीएसई 11 वी विज्ञान वर्ग सुरू केले आहेत.अशी माहिती संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.