सोनपेठ (प्रतिनीधी):सोनपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक नित्रुडकर कॉम्प्लेक्स येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त सर्व धर्मीय सभेचे आयोजन केले होते या सभेत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन उपनगराध्यक्ष तथा सिनेट सदस्य दत्तराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहरातील रोटरी क्लब सदस्य, जय भवानी मित्र मंडळ सदस्य, संभाजी ब्रिगेड सदस्य, मराठा सेवा संघ सदस्य, अखिल भारतीय वीरशैव महासंघ सदस्य नगरसेवक, प्राध्यापक, पत्रकार, व्यापारी मंडळी मोठ्या संखेने उपस्थित होते सर्वांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच महात्मा बसवेश्वर चौकामध्ये समाज बांधवांच्या वतीने बसवेश्वर जयंती चे आयोजन करण्यात आले होते माननीय डॉ.आशिषकुमार बिरादार तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे गुरु ऐकोरामाराध्याय व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानी श्री गुरु 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार डॉ.आशिष बिरादार, नगरसेवक अमृत स्वामी, संपादक किरण स्वामी, तलाठी एकलिंगे व तलाठी जमशेटे आदीजण उपस्थित होते प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, सदाशिवआप्पा राजमाने यांनी सपत्नीक श्री गुरु 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांची पादपूजा करण्यात आली, या प्रसंगी वेदमंत्र घोष प्रदीप स्वामी शास्त्री व प्रसाद स्वामी शास्त्री यांच्या वतीने करण्यात आली, प्रास्ताविक महालिंग मेहत्रे यांनी तर मनोगत प्रणव कुरले, स्वाती हलकंचे, बबन कुरे गुरुजी, डॉ आशिषकुमार बिरादार यांनी व्यक्त केले आशिर्वचन अध्यक्षीय समारोप श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य यांनी केला यानंतर आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.कारेक्रामाचे सूत्रसंचालन उमेशआप्पा नित्रूडकर यांनी केले शहरात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय जिल्हा परिषद शाळा व सर्व खाजगी संस्था मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.