सोयगाव : विजय जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील

सोयगाव दि.७: शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजय देविदास जाधव जि. प. प्रा. शाळा जामठी ता. सोयगाव जि. औरंगाबाद यांना जाहीर झाला आहे.

आतापर्यंत त्यांना शाळास्तरीय गुरूगौरव पुरस्कार, केंद्रस्तरीय गुरूगौरव पुरस्कार, तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत. राज्यस्तरीय बालरक्षक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. अध्यापन सोपे व मनोरंजनात्मक पद्धतिने होण्यासाठी ते बोलक्या बाहूल्यांच्या माध्यमातुन शिकवित असतात. विद्यार्थींमध्ये रममाण होणारे शिक्षक म्हणुन त्यांची ओळख आहे. शाळेतही विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे,अध्यापनात स्वनिर्मित साहित्याचा वापर करणे,इंग्रजी साठी विविध अँक्टीविटीज घेणे,सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांत विद्यार्थीना मार्गदर्शन करणे असे यांचे महत्वपुर्ण कार्य आहे. त्याचबरोबर अष्टपैलू शिक्षक म्हणुन ते ओळखले जातात.

हा राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कार त्यांना ३१ मे २०१९ रोजी औरंगाबाद येथील तापडिया नाट्यमंदिर येथे दिला जाणार आहे.

या पुरस्कारांची निवड सतिश कोळी,रामदास कवठेकर,ज्ञानेश्वर कपटी, श्रीमती वर्षा देशमुख, श्रीमती सुषमा खरे,विजय गवळी, पढरंनाथ तायडे, योगेश पाटील, मनोहर गावडे आदी मान्यवरांनी केली त्याबद्दल वरील सर्व महाराष्ट्र शिक्षक पँनलच्या शिलेदारांचे मनःपूर्वक धन्यवाद. या यशाबद्दल विजय जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोबत फोटो:-

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.