परळी वैजनाथ:परळी शहरातील हिंदनगर भागात अज्ञात युवकाचा मॄतदेह आज बुधवार दि.८ मे रोजी पहाटे ५ च्या सुमारास आढळून आला असून पोलिस मात्र ८ वा.घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा प्रकार नेमका काय आहे? हे तपासानंतरच समजू शकेल. दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याचे नागरिकांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी शहरातील हिंदनगर भागात आज बुधवार दिनांक ८ मे रोजी अज्ञात युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेमुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून या भागातील वाढणारे अवैध धंदे बंद करण्यात यावेत याबाबत पोलिस प्रशासनास लेखी निवेदने दिली असल्याचे या भागातील सामाजिक कार्यकर्ते कुमार केदारी यांनी सांगितले. आता तरी पोलिस प्रशासनाने या भागात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत यांनी केली आहे.