सोयगाव,दि.१५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करून घराच्या छाताचाच मंडप करून केवळ चारच वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने घोसला येथील जोडपे विवाहबद्ध झाले आहे.या चार वऱ्हाडी मंडळींमध्ये वधू-वरच्या आईवडिलांचा समावेश होता.
कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे यंदाच्या विवाह मुहुर्तंना ग्रहण लागले आहे.परंतु लॉकडाऊनच्या नियमांची पालन करूनही काही आदर्शवत विवाह सोहळे होत आहे.सोयगाव तालुक्यातील घोसला गावातील तरुणाचा विवाह सामाजिक अंतर नियमांचे पालन करून संपन्न झाला.या विवाहात वधू-वर यांचे आईवडीलच चक्क वऱ्हाडी झाले असल्याने चारच वऱ्हाडी मध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे.घोसला ता.सोयगाव येथील तरुण रवींद्र पाटील हा तरुण भानखेडा ता.बोदवड येथील निकिता पाटील या तरुणीशी लॉकडाऊनचे नियम पाळत विवाहबद्ध झाला आहे.या विवाहासाठी चक्क घराच्या छताचा मंडप करून घरातच साध्या पद्धतीने हा विवाह संपन्न झाला आहे.
0