औरंगाबाद जिल्हाप्रशासकीयब्रेकिंग न्युज

युवकांनी वृक्षारोपण बरोबरच वृक्ष संवर्धनासाठी योगदान द्यावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद-दि ४:आठवडा विशेष टीम― तरुणांनी वृक्षरोपण करण्याबरोबरच वृक्ष संवर्धनासाठी योगदान दिल्यास नक्कीच मराठवाड्यातील स्थिति बदलून हरित पट्यात वाढ होण्यास मदत होईल आणि संपूर्ण मराठवाडा हिरवाईने नटेल असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला.
जलसंपदा विभाग येथे यांत्रिकी कार्यालय क्रमांक 2 च्या जवळ अर्बन अफोरेस्टेशन प्रोजेक्ट च्या अंतर्गत प्रयास युथ फाउंडेशन आणि सेंटर फॉर रिसर्च ऍण्ड एजुकेशन च्या माध्यमातून आणि इंडसइंड बैंक च्या आर्थिक सहकार्याने ५ हजार देशी झाडांचे लागवडकरण्यात येणार असून आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते पहिला वृक्ष (वटवृक्ष) लावून सुरुवात करण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता वैजीनाथ गलांडे, प्रयासचे शिल्पा बाबरे, लक्ष्मण हिवाळे, विजय मुंढे आदींची उपस्थिती होती.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमे बदल बोलतांना श्री चव्हाण म्हणाले की, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव संपुष्टात आणण्यासाठी आपल्या सर्वांना सवयीत बदल करुन नवीन जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक आहे. त्याबाबत मार्गदर्शन करणारी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी”मोहिम कोरोनाला हद्दपार करण्यास उपयुक्त ठरणारी आहे. तरी सर्वांनी मोहिमेत सक्रिय सहभागी होत ही लोकचळवळ बनवावी. कोरोनाची साखळी तोडणे देखील तितकेच महत्वाचे आहे. यासाठी कोरोनासोबत जगणे आपल्याला शिकावे लागणार असून आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आपले कुटुंब सुरक्षित केल्यास पर्यायाने आपला महाराष्ट्र सुरक्षित होणार आहे. हा आरोग्य संकटाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळण असून निरोगी आयुष्यासाठी जनतेला तयार करण्याचे काम ही मोहिम करणार असल्याचे यावेळी सांगितले.

प्रयास युथ फाउंडेशनचे रवि चौधरी म्हणाले की जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचे व संगोपन चे कार्य हाती घेणार असून येणाऱ्या पाच वर्षात संस्थे मार्फत १० लाख झाड़े लावण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
वृक्ष रोपणानंतर श्री चव्हाण यांनी या परिसरात असलेल्या जवळपास १५०० वर्ष पर्यन्त जगणाऱ्या गोरखचिंच (बहोबाबा) झाडांचे निरीक्षणं करून या झाडाची औषधी ऊपयोगा बदल माहिती घेतली.
या वेळी मागच्या वर्षी लावण्यात आलेले अर्बन फारेस्ट मध्ये जाऊन जिल्हाधिकारी तसेच इतर मान्यवर यांनी एक छोटी जंगल यात्रा केली आणि एक वर्षात झालेले वाढ आणि चांगल्या प्रकारे केले गेले संगोपन साठी प्रयास आणि जलसंपदा विभागाचे कौतुक ही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button