आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव : भगवान परशुराम महाराज यांची जयंती तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आली. शहरातील राम मंदिरात झालेल्या मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय शहापूरकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर कुलकर्णी व शांताराम जोशी हे होते.
मान्यवरांनी परशुराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विनायक जोशी यांनी प्रास्ताविक केले. कवी अरविंद कुलकर्णी यांनी भगवान परशुराम महाराज यांचा जीवनपट उलगडला याप्रसंगी प्रभाकर कुलकर्णी हितेश कुलकर्णी मालती जोशी किशोर कुलकर्णी व संजय शहापूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष हितेश कुलकर्णी ,सचिव सुनील जोशी ,महेश जोशी ,अक्षय कुलकर्णी ,अमोल कुलकर्णी, गजानन जोशी ,प्रणव कुलकर्णी यांच्यासह महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.